Tuesday, 1 August 2017

प्रशंसा करताना ...........


इथे पिछेहाट नको !!

आपल कौतुक झालेल कुणाला नाही आवडणार ?

प्रत्येक व्यक्तीला वाटते की एकदा तरी कोणाकडून तरी आपल कौतुक व्हाव.

पण कौतुक करताना आपल बोलण समोरच्याला आवडल नाही तर........ 

प्रभावीपणे आणि योग्यरीतीने स्तुती कशी करायची ही एक कला आहे.

खोटी प्रशंसा नेहमीच दिखाऊ अणि नाटकी असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यातील सुप्त हेतु चटकन कळतो.

म्हणूनच कदाचित कोणाबद्दल कौतुक करताना आपण  जरा मागेच पडतो.

आपण केलेल्या कौतुकामुळे समोरच्या व्यक्तीला किंवा लोकाना  काहीतरी  मिळवण्याच्या उद्देशाने खुशामत  करत आहोत असा गैरसमज होईल या भीतीने!

अशावेळी प्रशंसा करताना आपण हे करू शकतो. 

व्यक्तीची प्रशंसा करण्यापेक्षा त्याच्या कामाची, प्रयत्नांची  अणि कौशल्याची असावी.

व्यक्तीच नाव घेऊन चारचौघात मोठ्याने पण मोजक्या आणि सहज  शब्दांत असावी .

जेव्हा आपण कौतुक करण्याची सवय करतो तसतस आपल्या ओठातून सहजपणे प्रशंसा बाहेर पड़ते...... अगदी मनापासून ,दिलख़ुलासपणे 
अनामिका 
Friday, 28 July 2017

सुखी माणसाचा सदरा ................


अजूनही शोधत आहोत ???

आपल्या सगळ्यांना सुखी माणसाच्या सदऱ्याची गोष्ट तर माहित असेलच . 

किती खरी आहे कि नाही हि गोष्ट. 

आपल्या आयुष्यात सुख नाही हेच टुमणं आपणदेखील सतत मिरवत असतो, सुखाचे चार क्षण हि आपल्या मिळत नाही हेच रडगाणं गात असतो. त्या गोष्टीतल्या राजासारखं. 

पण अगदी खरं खरं सांगा , आपल्या जगण्यात खरंच सुख नसतं ??

सुख आपल्या अवतीभवती असतं, ते दिसाव अशी नजर मात्र डोळ्यात असावी लागते. 

रोज झोपेतून उठतो आणि पहिला श्वास घेतो .. तो श्वास हा मिळालेला पहिला आशीर्वाद ... जगण्यासाठी 

डोक्यावर छप्पर असलेल्या सुरक्षित चार भिंतीमध्ये ,मायेनं आज काय जेवणार हे विचारणारी माणसं आहेत. जीवाला जीव देणारे दोस्त आहेत तरीही सुख नाही असं कसं म्हणता येईल??

कष्ट करायला धडधाकट शरीर , वाट्टेल ते करू शकू अशी धमक आणि काळजात हिम्मत हे सारे सुखाच्या यादीत येत नाही का ?

आपल्याला मिळणाऱ्या सुखाचं मोल मनात मांडून ठेवलं तर ते नक्की मिळतं. 

शेवटी सुख हे मानण्यात असत नाही का ??

अनामिका मनि तोषिले ..............

जे जे सुंदर आहे ते  !!

आपल्या अवतीभवती सर्व गोष्टींमध्ये सौंदर्य पाहून जीवन अधिक चांगले होते . 

आपण जेव्हा खरोखर सुंदर दिसतो  तेंव्हा आपल्याला कसं वाटतं , याचा विचार करून पहा. आपण आपल्या जीवनातील सुंदर गोष्टींच्या जाणिवेने उत्साहित आहात अस वाटेल . 

मग सर्व  गोष्टींमध्ये सौंदर्य दिसत असेल तर ...... 
  • आपल्या बाळाने टाकलेल पहिल पाऊल  बघताना आईच्या चेहऱ्यावर उमटलेल्या कौतुकारुपी आश्चर्यामधून . 
  • मेहनत करून भरघोस पीक आल्यावर शेताकडे  डोळे भरून बघणाऱ्या  शेतकऱ्यांच्या डोळ्यात.  
  • सर्वांच्या सुख आणि कल्याणाच्या मागणीची ईश्वराकडे प्रार्थना करताना मिळलेल्या समाधानात. 
जे जे डोळयांना आणि मनाला भावलं, त्याने आनंद  मिळाला. 

या आनंदासाठी कुठलेही व्यसन , पैसे , सत्ता किंवा शारीरिक सुखाची गरज लागली नाही.  


अनामिका 


Wednesday, 26 July 2017

स्वतःविषयी जाणिव होऊ दे .........

विचारांची निवड करा   !!!

आजूबाजूला रोज काही ना काही घडत असतं. या प्रत्येक घटनामध्ये आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सामील असतो.  
ह्या घटनांसोबत नकळत आपलं भावनिक विश्व बनत जातं, ज्या सगळ्यांचा आपल्या विचारांवर  परिणाम होत असतो. 

अशावेळी गरज असते , आपल्या विचारांची दिशा शोधण्याची. 

एखाद्या वाईट घटनेचा सतत विचार करून आपण  स्वतःला किंवा इतरांना  त्रास करून, डोक्यात नकारात्मक विचारांचे थैमान तर मांडले नाही ना !

तुमच्या होकारात्मक विचारलहरींनी तुमच्या भोवती Positive energy निर्माण होत असते. जे आजूबाजूचं वातावरण  हलकंफुलकं आणि आनंदी कराण्यास  मदते. ज्यात कुठलीही भावनिक गुंतागुंत किंवा स्ट्रेस नसतो.


त्या भावनांना आपण कसा प्रतिसाद देतो यावरून आपल्याला आपल्या स्वतःविषयीची जाणीव होऊ शकते.दिवसाखेरी स्वतःला थोडा वेळ देऊन, त्यावर शांतपणे विचार करून आपण हे सहज करू शकतो. 
  
थोडक्यात सांगायचं तर, तुमच्या डोक्यात एखाद्या घटनेचे  विचार किती वेळ चालले आणि त्यांनां तुमच्या भावनिक  Reactions  कशा होत्या, याचा तटस्थ राहून शोध घेणं.

या भावनिक Reactions तुमच्यासाठी योग्य आहेत का यावर लक्ष असू द्या. 

सरतेशेवटी, Thoughts are your creation.

तुम्ही कुठल्या विचारांची निवड करता, यावरून तुमचीओळख बनते........ 

इतरांनाही  आणि  स्वतःलाही 


अनामिका Tuesday, 25 July 2017

उगवत्या सूर्याचा संदेश .........

लवकर उठा !!

लवकर उठण्याचा महत्व आपल्याला पटलेल नसतं असं आहे कि आणखी काही ??

आपण अजूनही सकाळी लवकर उठणाऱ्यांपैकी नाही आहात,तर आजपासूनच त्यासाठी प्रयत्न करा. 

तुमच्या आतून येणाऱ्या आवाजाला कंट्रोल करणं आवश्यक असतं. 
जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सांगता कि अरे काल रात्री उशिरा झोपलास , काय लवकर उठतो किंवा अजून थोडी पाचं मिनिटे झोपून राहिलो तर काही बिघडणार नाही ...... फक्त पाच मिनिटे. ऐकू नका !!!

आपल्यापैकी बरेच जण जेव्हा अंथरुणातच असतात, तेव्हा आपल्यापैकी काही जण त्यांचं आयुष्य आणि आरोग्य सुधारण्यात गुंतलेले असतात. 

आपल्या केवळ एक तास लवकर उठण्याने दरवर्षी १५ दिवस जास्त मिळतात. 

सकाळचा व्यायाम आपल्याला अधिक कार्यक्षम आणि स्फूर्ती देऊन , यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे राहण्यास मदत करतो. 
तुमच्यातल्या सुप्त गुणांचा उलगडा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर सकाळी लवकर उठणे हा त्यावर पर्याय असू शकतो. 

म्हणूनच सकाळी लवकर उठा, तुमची स्वप्न साकारण्यासाठी 


अनामिका 

Friday, 21 July 2017

थांबला तो संपला ......

 चालाल , तर पुढे जाल 


एक छोटासा झरा वाहत वाहात आपली वाट तयार करतो आणि शेवटी त्याचं  मोठया नदीमध्ये रूपांतर होते. त्या झऱ्याने  वाहायचे सोडून दिले तर डबक तयार होते. 

माणसाचं हि असंच  नाही का ......... 
 डॉक्टर सांगतात रोज चालणे, हा सगळ्यात स्वस्त आणि  सोपा व्यायाम आहे. पायी चालणाऱ्या माणसाचं आरोग्य उत्तम राहते. 

सतत हात चालणाऱ्या माणसाच्या हातांना कौशल्य मिळते. सरावने शिल्पकाराच्या हातून अप्रतिम कलाकृती तयार होतात . 

शास्रज्ञाच्या विचारातून नवीन नवीन शोध लागतात . विचारातून दृष्टिकोन बदलतात , आयुष्य जगण्याची समज वाढते.  स्वतःला विचार करण्यापासून थांबवलं तर बुद्धीला गंज लागतो. बुद्धी चालेल तर ज्ञान वाढेल.


पैशाला चालना दिली तर वाढत जातो. पैसे गुंतवणुकीने सतत वाढतात , तर साचून ठेवल्याने त्याची किंमत कमी होते. 

म्हणूनच स्वतःला थांबवू नका 

विचार कारण्यापासून ----------- बुद्धीचा वापर करण्यासाठी 
हातांना काम करण्यापासून-------- कुशलता मिळवण्यासाठी 
पायांना चालण्यापासून---------- सुदृढ आरोग्यासाठी 
पैसे गुंतवणुकीपासून -----------उज्ज्वल भविष्यासाठी 

BE UNSTOPPABLE 😊
अनामिका 
Tuesday, 18 July 2017

मना प्रार्थना तूजला एक आहे .........

 स्वतःशी सकारात्मक बोल !!😮अनेकदा आपण स्वतःशी संवाद करत असतो. काय बरं ऐकायला मिळत आपल्याला अंतर्गत ?

मनात  येणाऱ्या नकारत्मक विचाराबद्दल आपण  जागरूक असतो  का ?

बऱ्याच वेळा मनाशी संवाद करताना आपल्या लक्षात येईल की आपण  स्वतःवर  नाराज असतो, कठोर वागणूक देतो  आणि नकारात्मक संवाद करू लागतो. जेणेकरून मन खचून जाऊन चिंताग्रस्त, नाउमेद , सतत दडपणाखाली असल्याचं वाटू लागत😞


अशावेळी स्वतःशी केलेली मैत्रीसारखी दुसरी मैत्री कुठलीहि नाही, जी आपल्यासोबत  कायम जोडलेली असेल. 

जेव्हा कधी आपण आपल्या भावना स्वतःशी व्यक्त करतो, तेव्हा असा विचार करा की त्या आपण आपल्या मित्राला बोलू शकतो का ?

जर का उत्तर नाही असेल, तर संवाद थांबवण्याची  गरज आहे. 

मनाशी असलेला चुकीचा संवाद थांबला की तो सुसंवादात अर्थातच सकारात्मक विचारामध्ये बदलू शकतो. 

मग आजपासून मनाला सांगा," रे बाबा थांब जरा, नको ती नकारघंटा वाजवूस."


अनामिका